सावंतवाडी, दि.२०:राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

यावेळी विवध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ओमकार पराडकर ग्रुप मालवण किल्ल्यावरून मशाल घेऊन सावंतवाडी दाखल झाल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले . त्यानंतर कै .सुधाताई कामत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा येथे.रंगभरण स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित रंग भरण स्पर्धेतील प्रथम द्विविजा दिपक पंडित, द्वितीय योगी मेघनाथ लेले,तृतीय अभिमन्यू देसाई .यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
यावेळी कार्यालयात शिवप्रतिमेला पुष्पहार घालून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेना अध्यक्ष संतोष तळवणेकर ,उपाध्यक्ष संदीप नाईक ,खजिनदार .ज्ञानेश्वर पारधी ,सदस्य सचिन गावडे .राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य .उपाध्यक्ष .रामचंद्र कुडाळकर ,सचिव कल्याण कदम सल्लागार श्याम सावंत . .संदीप चांदेकर . सचिता .गावडे .मनोहर पाट .रवींद्र मोघे .समीक्षा मोघे .संगीता पारधी .दुर्गेश सदानंद रांगणेकर संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.



