मालवण येथील शिवराजेश्वर मंदिरात आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात साजरी..

0
125

मालवण,ता.१९: किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आज कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक तसेच शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज की..जय..’जय भवानी….जय शिवाजी’ अशा घोषणांनी, ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मंदिरात आमदार नाईक यांच्या हस्ते मूर्तीस जिरेटोप, पुष्पहार अर्पण करण्यात आला. भगवे फेटे, झेंडे यामुळे किल्ला परिसर भगवामय बनला होता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात साजरी करण्यात येते. छत्रपतींनी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये किल्ले सिंधुदुर्गला ऐतिहासिक महत्त्व आहे.. या किल्ल्यात देशातील एकमेव असे महाराजांचे शिवराजेश्वर मंदिर आहे. आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून छत्रपतींच्या सिंहासनाचे नवीन बांधकाम नुकतेच करण्यात आले. यानंतर आज प्रथमच किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here