सावंतवाडी, दि.१९ : तालुक्यात आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत बांदा येथील रोजे घुमटाची स्वच्छता संवर्धन मोहीम राबवून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
निवृत्त शिक्षक दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अरुण म्हाडगुत यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. घोगळे व शंभूराजे बोराडे यांनी उपस्थित लोकांना शिवचरित्र सांगितले. त्यानंतर ह.भ.प. नवनाथजी बोराडे महाराज यांचे ‘राजेंची प्रेरणा व वर्तमानाची घडण’ या विषयावर व्याख्यान झाले.
व्याख्यानानंतर रोजे घुमट स्वच्छता मोहीम क्रमांक २ राबविण्यात आली यात रोजे घुमटाच्या तळ मजल्याची उजवी बाजू व मागील बाजूची स्वच्छता करण्यात आली. सदर मोहिमेला रशियन पर्यटकांनी तसेच बांदा ग्रामपंचायत उपसरपंच जावेद खातीब यांनी भेट दिली.
या शिवजन्मोत्सव कार्यक्रमाला अरुण म्हाडगुत, गणेश नाईक, प्रसाद सुतार, समिल नाईक, पंकज गावडे, सुनिल धोंड, शिवाजी परब, नवनाथ बोराडे, सच्चिदानंद राऊळ, युवराज राठोड, सुहास सावंत, संकेत सावंत, जालिंदर कदम, योगेश येरम, अजिंक्य गोसावी, किरण परब, शितल नाईक, परब, गार्गी नाईक, बाबुराव घोगळे, युक्ती राठोड, वेदांती राठोड, दक्षता घोगळे, शंभूराजे बोराडे, राजाराम फर्जंद, आकांक्षा फर्जंद, भूमी सावंत, गौरेन परमेकर, गणपत गवस आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अल्पोपाहर व चहापानची सोय समिल नाईक व शितल नाईक यांनी केली.
यावेळी दुर्ग मावळा परिवारातर्फे सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले.