१२ फेब्रुवारी रोजी होणार महोत्सव : मंत्री केसरकर राहणार उपस्थित
सावंतवाडी,दि.११: येथील वैश्य समाजाचा १२ फेब्रुवारी रोजी शतक महोत्सवी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला असून यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा वैश्यवाणी समाजाचा वधू वर मेळावा रविवारी रोजी होणार आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात श्री वामनाश्रम स्वामीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून होणार आहे.
वैश्य समाजाच्या शतक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आज शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून यात्रेत सर्वेश भिसे कणकवली महिला आणि पुरुष यांचे डोळ्याचे पारणे फेडणारे ढोल पथक व नेहरू येथील चित्ररथाचा सहभाग असणार आहे.
ही शोभायात्रा सालाईवाडा मुरलीधर मंदिर ते वैश्य भवन गवळी तिठा येथून जाणार असून या यात्रेत मंत्री दीपक भाई केसरकर सहभागी असणार आहेत, त्यानंतर सायंकाळी सहा ते आठ दरम्यान महिलांसाठी फनी गेम्स व संगीत खुर्ची चे आयोजन करण्यात आले आहे.
अशी माहिती वैश्य समाज सावंतवाडी यांच्या प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.