सावंतवाडी, दि.०९ : कोंडुरा तिठा परिसरात मटका-जुगारावर सावंतवाडी पोलिसांनी धाड टाकत एकावर कारवाई केली गुरूवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही धाड टाकण्यात आली.
याप्रकरणी लक्ष्मण रामचंद्र कासले रा. आरोस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून ६४५ रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
कोंडुरा येथे जुगार मटका खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अचानक धाड टाकली. यावेळी त्यांनी एकावर कारवाई करत ६४५ रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात लक्ष्मण कासले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.