सावंतवाडी, दि.०९ : अवैध दारू बाळगल्या प्रकरणी सातार्डा येथे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रायाचेपेड परिसरात करण्यात आली. दिगंबर पांडुरंग नाईक (३८ रा. सोनुर्ली), असे संशयिताचे नाव आहे.
त्याच्याकडून २ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित नाईक हा हातातील पिशवी मधून गोवा बनावटीची दारू घेऊन पायी चालत जात होता. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांना त्यांच्याबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी पिशवीची तपासणी केली असता आत मध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली.
त्यामुळे त्याच्यावर कारवाई करत मुद्देमाल जप्त केला. तसेच येथील पोलीस ठाण्यात अवैध दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस लक्ष्मण परब व नरेश कुडतरकर यांनी केली.