निवती किल्ल्यावर स्वच्छता मोहीम संपन्न: महादरवाजा मोकळा!

0
51

दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा उपक्रम; अनेक मावळ्यांचा सक्रिय सहभाग

मालवण,दि.०७: आज, रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी मालवण जवळील निवती किल्ला येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे भव्य स्वच्छता मोहिमेचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत किल्ल्याच्या ऐतिहासिक महादरवाजाची स्वच्छता करण्यावर विशेष भर देण्यात आला.

दुर्ग मावळा प्रतिष्ठान दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वच्छता तसेच संवर्धन मोहिमेचे आयोजन करत असते. यंदाच्या मोहिमेदरम्यान झाडी-झुडपांनी पूर्णपणे झाकोळून गेलेला महादरवाजा पुन्हा एकदा मोकळा करण्यात आला आहे. यामुळे किल्ल्याच्या सौंदर्यात आणि ऐतिहासात भर पडली आहे.

या स्वच्छता मोहिमेमध्ये संस्थेचे स्वप्निल साळसकर, ज्ञानेश्वर राणे, यतिन सावंत, प्रसाद पेंडूरकर, साईप्रसाद मसगे, हेमलता जाधव, समिल नाईक, गणेश नाईक या मावळ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन श्रमदान केले.

सदर मोहिमेसाठी शिवप्रसाद मुळीक यांनी मोलाचे सहकार्य करत ग्रास कटर उपलब्ध करून दिला. त्यांच्या या महत्त्वपूर्ण मदतीबद्दल दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here