सावंतवाडी, दि.०८: रेशन धान्य दुकानदारांच्या प्रलंबित विविध मागण्याबाबत शासनाचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डिलर फेडरेशनने मंगळवार ७, ८ व ९ रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ सहभागी होणार असून याबाबतचे निवेदन सावंतवाडी तालुका धान्य दुकानदार व केरीसिन विक्रेता संघटनेच्या वतीने सावंतवाडी तहसीलदार मनोज मुसळे यांना देण्यात आले.
या तिन्ही दिवशी धान्य व केरोसीन वितरण संपूर्ण जिल्ह्यात बंद राहणार असून पुरवठा विभागामार्फत होणारे धान्य उचल व इतर प्रशासकीय व्यवहारही व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याचे धान्य दुकानदारानी स्पष्ट केले आहे.यावेळी सावंतवाडी तालुका धान्य दुकानदार व केरीसिन विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गणपत राणे, उपाध्यक्षा सौ तन्वी परब, सचिव अमेय गावडे, खजिनदार अनिकेत रेडकर, सदस्य संजय मळीक, संगीता कोकरे, नाव्या जाधव, कानसे, श्रीकांत केरकर, गायत्री सावंत, शर्वरी भाईप आदी सावंतवाडी तालुक्यातील रेशन दुकानदार उपस्थित होते.