…तर डी एम आर स्पोर्ट्स संघ ठरला उपविजेता
सावंतवाडी,दि.०६. तालुक्यातील शिरशिंगे येथे दिनांक पाच ( ५) आणि सहा ( ६ )फेब्रुवारी रोजी शिरशिंगे प्रीमियर लीग पर्व ३ रे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेत एकूण आठ संघानी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचा अंतिम सामना पीसी बॉईज विरुद्ध डी एम आर स्पोर्ट्स या संघांमध्ये झाला.
या तिसऱ्या पर्वाचे मानकरी संघ मालक संदेश घाडी आणि अनिल राणे यांचा पीसी बॉईज संघ ठरला विजेता ..तर संघमालक ज्ञानेश्वर राऊळ यांचा डी एम आर स्पोर्ट्स हा संघ ठरला उपविजेता.
या संपूर्ण स्पर्धेत सुरेख कामगिरी करत राजेश कदम हे मालिकावीर ,रमेश राऊळ उत्कृष्ट फलंदाज,शुभम घावरे उत्कृष्ट गोलंदाज,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुदर्शन राऊळ ,उत्कृष्ट झेल गिरीश गावडे ,उदयनमुख खेळाडू ओमकार राऊळ, सर्वाधिक विकेट सुमित परब ,तर सर्वाधिक षटकार रमेश राऊळ यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
विजेता व उपविजेता संघाला सरपंच दीपक राऊळ यांच्या हस्ते रोख रक्कम आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सरपंच दीपक राऊळ यांच्यासोबत जीवन लाड, प्रशांत देसाई, वसंत घावरे, वासुदेव राऊळ, सुभाष राऊळ, सुरेश राऊळ, विरवाडी क्रिकेट क्लबचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.