सावंतवाडी,दि.२१: शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने रोणापाल येथील दयासागर छात्रालयाला उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांच्याकडून सीसीटीव्ही कॅमेरा किट भेट देण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या सोहळ्याला उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, तालुकाप्रमुख बबन राणे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य गजानन नाटेकर, रोणापालचे माजी सरपंच उदय देऊळकर, प्रकाश गावडे, राजन परब, उदय गावडे आणि राऊळ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना, तालुकाप्रमुख बबन राणे यांनी दयासागर छात्रालयाचे कौतुक केले. ‘अखिल भारतीय सेवा अभियान’ संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या या छात्रालयात मुलांना चांगले संस्कार आणि शिक्षण दिले जात आहे. भविष्यातही या संस्थेला संजू परब यांच्याकडून आणि आपल्याकडून कायम सहकार्य लाभेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनीही या छात्रालयाला ‘आपले वैभव’ असे संबोधले. येथे गरीब आणि गरजू मुलांना योग्य दिशा दिली जात असल्याबद्दल त्यांनी संस्थेचे तसेच तेथील सेवाभावी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. भविष्यातही सर्वजण मिळून संस्थेला मदत करतील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार दयासागर छात्रालयाचे व्यवस्थापक जीवा वीर यांनी मानले.




