सावंतवाडी,दि.४: येथील प्रसिद्ध व्यापारी, विठ्ठलभक्त आणि माजी शालेय शिक्षण मंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक प्रसन्न उर्फ नंदू चंद्रकांत शिरोडकर (वय ६०) यांचे शुक्रवारी दुपारी राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराआधीच त्यांचे निधन झाले. सावंतवाडीतील सामाजिक, धार्मिक क्षेत्रात त्यांचे कार्य होते. सावंतवाडी विठ्ठल मंदिर रोडवर त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.
नंदू शिरोडकर अतिशय सुस्वाभावी व मितभाषी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने सावंतवाडी शहरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.