शिरशिंगे गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..

0
21

सावंतवाडी,दि.०४: कोरोना महामारीच्या वेळी रोजगार हरवलेल्या पालकांना शैक्षणिकदृष्ट्या खारीचा का होईना हातभार लागावा व मुलांमध्ये सामाजिक, दातृत्वाची भावना निर्माण व्हावी, याकरिता माजी विद्यार्थी आणि शाळा या मधील सलोख्याचे संबंध अधिक दृढ व्हावे या उद्देशाने शिरशिंगे गावचे तत्कालीन माजी उपसरपंच पांडुरंग मधुकर राऊळ आणि माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने २०१८ साली

शिरशिंगे गावातील तीन जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, अंगणवाडी यामधील सर्व विद्यार्थांना मोफत सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम गेली ७ वर्षांपासून राबविला जात आहे. माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांना व्हाट्सअप ग्रुप वर आव्हान केले जाते.

यावर्षी ही मुलांना दाते व ग्रामस्थ यांचा उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा शिरशिंगे नंबर १ मध्ये पार पडला. त्यानंतर हायस्कूल,गोठवेवाडी, मळई जिल्हा परिषद शाळा व सर्व अंगणवाडी येथे प्रत्यक्ष जाऊन साहित्य वाटप करण्यात आले.या वेळी शिरशिंगे गावचे प्रथम नागरिक सरपंच दिपक राऊळ,माजी सरपंच नारायण राऊळ, माजी उपसरपंच पांडुरंग राऊळ, माजी सरपंच जीवन लाड, सामाजिक कार्यकर्ते गणपत राणे, प्रशांत देसाई,

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.माधवी राऊळ, राजेंद्र सावरवाडकर, अनंत शिर्के, सोमनाथ धोंड, समीर धोंड, यशवंत राऊळ, शांताराम निकम,राजेश गोवेकर, सौ. साक्षी राऊळ, मयुरी लिंगवत मुख्याध्यापिका सौ. सोनटक्के, सहशिक्षिका राधिका परब, निता सावंत, रिया सांगेलकर बाई,अंगणवाडी सेविका वनिता राऊळ, दिव्या राऊळ, राजलक्ष्मी सावरवाडकर आदी ग्रामस्थ व दाते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here