सावंतवाडी,दि.१९: शहरातील जिमखाना मित्र मंडळ यांच्या वतीने जि.प.पू. शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना आज मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत होणार असून,मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासाठी होणारा आर्थिक भार कमी होतो. जिमखाना मित्र मंडळाने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.
मंडळाचे अध्यक्ष अजित सांगेलकर यांनी बोलताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी आणि त्यांच्या शिक्षणाचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे म्हटले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित सांगेलकर उपाध्यक्ष इम्रान शेख सल्लागार राजू कासकर, सदस्य म्युजिब शेख आदि पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मिलिंद देसाई, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संजना वराड, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता डांगी, शिक्षिका दीप्ती सोनवणे, श्रीमती मेरा मुद्राळे, अश्विता चव्हाण, सांगेलकर, सारिका पाटील, जमना पाटील, शितल परब, स्वप्नजा सावंत, आदी पालक वर्ग उपस्थित होते.