सावंतवाडी,दि.१९: महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ यांच्यामार्फत राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ४ शाळेच्या मुलांनी चमकदार कामगिरी करत ‘सिल्वर’ श्रेणीत (Silver Category) आपले स्थान पटकावले आहे. या यशाबद्दल विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
गणित प्रज्ञा परीक्षा ही विद्यार्थ्यांमधील गणिताची आवड आणि त्यांची तार्किक क्षमता वाढवण्यासाठी घेतली जाणारी एक महत्त्वाची स्पर्धा आहे. या परीक्षेत राजभरातून हजारो विद्यार्थी सहभागी होतात आणि त्यात सावंतवाडीच्या छोट्या शहरातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाच्या वतीने एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत सावंतवाडी नंबर चार शाळेतील कु. पार्थ अशोक बोलके, कु. हार्दिक अनिल वरक व कु. वीरा राजीव घाडी यांनी राज्याच्या सिल्वर कॅटेगिरीत स्थान मिळवले आहे. या तीनही मुलांनी प्रचंड मेहनत करून हे यश मिळवले आहे. या मुलांचे तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षक महेश पालव यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. चार (४) नंबर शाळा सावंतवाडीने नेहमीच शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे. शाळेतील शिक्षकांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे हे यश संपादन करणे शक्य झाले, असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या यशाने चार नंबर शाळा सावंतवाडीचे नाव रोशन झाले असून, इतर विद्यार्थ्यांनाही गणितासारख्या विषयात अधिक रुची घेण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ यांच्यामार्फत राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ४ शाळेच्या मुलांनी चमकदार कामगिरी करत ‘सिल्वर’ श्रेणीत (Silver Category) आपले स्थान पटकावले आहे. या यशाबद्दल विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
गणित प्रज्ञा परीक्षा ही विद्यार्थ्यांमधील गणिताची आवड आणि त्यांची तार्किक क्षमता वाढवण्यासाठी घेतली जाणारी एक महत्त्वाची स्पर्धा आहे. या परीक्षेत राजभरातून हजारो विद्यार्थी सहभागी होतात आणि त्यात सावंतवाडीच्या छोट्या शहरातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाच्या वतीने एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत सावंतवाडी नंबर चार शाळेतील कु. पार्थ अशोक बोलके, कु. हार्दिक अनिल वरक व कु. वीरा राजीव घाडी यांनी राज्याच्या सिल्वर कॅटेगिरीत स्थान मिळवले आहे. या तीनही मुलांनी प्रचंड मेहनत करून हे यश मिळवले आहे. या मुलांचे तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षक महेश पालव यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. चार (४) नंबर शाळा सावंतवाडीने नेहमीच शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे. शाळेतील शिक्षकांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे हे यश संपादन करणे शक्य झाले, असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या यशाने चार नंबर शाळा सावंतवाडीचे नाव रोशन झाले असून, इतर विद्यार्थ्यांनाही गणितासारख्या विषयात अधिक रुची घेण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.