सावंतवाडी,दि.१८: सावंतवाडी शहरात गेल्या काही दिवसांपासून विजेच्या दाबामध्ये सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे (व्होल्टेज फ्लक्चुएशन) नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विजेचा दाब कमी-जास्त होत असल्याने घरातील आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमधील अनेक विजेची उपकरणे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी तर उपकरणे नादुरुस्त झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
शहर परिसरात, विशेषतः बिरोडकरटेंब,सुवर्ण कॉलनी येथे विजेच्या व्होल्टेजमध्ये सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. यामुळे रेफ्रिजरेटर, दूरदर्शन संच (टीव्ही), वातानुकूलक (एसी), पंखे, मिक्सर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे अचानक बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
“महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे.”
या समस्येवर त्वरित तोडगा न काढल्यास नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल.