सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या वतीने ‘जागतिक रक्तदाता दिन’ साजरा
वेंगुर्ला,दि.१७ : सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या सस्थेच्या वतीने शनिवार १४ जुन २०२५ रोजी ‘जागतिक रक्तदाता दिन’ वेंगुर्ला येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.यावेळी ‘जागतिक रक्तदाता’ दिनाचे औचित्य साधून सातार्डा गावची स्नुषा व रा.कृ.पाटकर हायस्कुच्या आदर्श व उपक्रमशील शिक्षिका सौ.समृद्धी संजय पिळणकर – मुननकर यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला,तसा फॉर्म भरून त्यांनी संस्थेकडे सुपूर्द केला.
सौ.समृद्धी संजय पिळणकर या वेंगुर्ला एज्यूकेशन सोसायटी या संस्थेत २०१० पासून शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.संस्थेच्या दाभोली इंग्लिश स्कूल दाभोली हायस्कुलमध्ये त्यांनी १२ वर्षें सेवा बजावली.तर २०२२ पासून त्या रा.कृ.पाटकर हायस्कुलमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी घेतलेल्या नेत्रदानाच्या निर्णयाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
यावेळी ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते भाई देऊलकर,आयटीआय वेंगुर्लाचे प्राचार्य जगदीश गवस,ज्येष्ठ शिक्षक जोवेल डिसिल्व्हा,सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेचे आयडॉल व सल्लागार सुधीर पराडकर,आनंद वेंगुर्लेकर,संस्थेचे उपाध्यक्ष महेश राऊळ,सावंतवाडी – दोडामार्ग विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर,सौ.अश्वेता माडकर आदी मान्यवर उपस्थित होते.