महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या रात्रीही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद..

0
56

कार्यक्रमाला उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती..

सिंधुदूर्ग,दि. ९ : सावंतवाडी जिमखाना मैदानावर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवाच्या आजच्या चौथ्या रात्री अशोक हांडे प्रस्तुत चौरंग संचलित ‘मराठी बाणा ‘ कार्यक्रम सावंतवाडीकरांसह उपस्थित जिल्हावासियांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कार्यक्रम स्थळी भेट देत कार्यक्रमाचा आनंद लुटला.

यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय अधिकारी श्री सोनुने, तहसीलदार श्रीधर पाटील आदी उपस्थित होते.

मराठी सण उत्सव परंपरा यांच्या कार्यक्रमाने रसिक प्रेक्षक आनंदून गेले. १५० कलावंतांच्या गीत संगित व नृत्याविष्काराच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

अशोक हांडे यांचे लेखन व संकल्पना असलेला हा गीत गायन वादन नृत्य यांचा सुरेख संगम असलेला कार्यक्रम रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला. गण गवळण अभंग भारुड गोंधळ याला नृत्याचा साज चढवित केलेले सादरीकरण उपस्थित रसिकांना भावले. रसिकांनी या सर्व कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here