श्रीराम वाचनमंदिर सावंतवाडी येथे ११ फेब्रुवारी रोजी मनसे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा

0
88

सावंतवाडी,दि.१०: मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू आणि सिंधुदुर्गातील दमदार नेतृत्व मनसे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप दळवी, मनसे कामगार सेना अध्यक्ष गजानन राणे यांच्या येण्याने सिंधुदुर्गातील आजी माजी कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे. त्या अनुषंगाने सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सावंतवाडीतील श्रीराम वाचनालय येथे सकाळी शनिवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मनसे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मेळावा ठेवला आहे. तरी या मनसे मेळाव्यास आजी माजी कार्यकर्ते, आणि पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त उपस्थिती दाखवावी आणि राज ठाकरे यांना पाठबळ द्यावे मनसे व पक्षाला उभारी देण्यासाठी या मेळाव्यात सर्वांची उपस्थिती दर्शवावी असे आवाहन मनसैनिक सुधीर राऊळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here