सावंतवाडी,दि.०९: तालुक्यातील धवडकी येथील दत्तकृपा मंडळ धवडकी आयोजित धवडकी प्रीमिअर लीग पर्व ८ वे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक १० ते ११ फेब्रुवारी दरम्यान येथील चिले मैदान येथे होणार आहे.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक २५००० व चषक, द्वितीय १५००० व चषक व इतर आकर्षक बक्षीसांची खैरात असणार आहे.
अशी माहिती धवडकी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा क्रिकेप्रेमी अमित राऊळ यांनी दिली.