माजी आमदार परशुराम उपरकर यांचा मनसेला जय महाराष्ट्र..

0
153

पक्षाध्यक्षांकडे दिला प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

सिंधुदुर्ग,दि.०८: महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या सरचिटणीस पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे पत्र परशुराम उपरकर यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे .

दिलेल्या पत्रात म्हटले की, मी श्री.परशुराम उपरकर आपणास या पत्रा द्वारे कळवू इच्छितो की, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या सरचिटणीस या पदाचा राजीनामा देत आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा ही राजीनामा देत आहे. आपणास विनंती आहे माझा हा राजीनामा आपण स्वीकारावा.

अशा आशयाचे पत्र पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना दिले असल्याची माहिती माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here