बांदा,दि.०८: ठाकरे शिवसेना कार्यकर्ते ज्ञानेश्वर गणपत येडवे यांची बांदा जिल्हा परिषद विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार याबाबतचे नियुक्तीपत्र शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्री.येडवे यांना आज देण्यात आले.
यावेळी बोलताना श्री येडवे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्वासन जिल्हा प्रमुख संजय पडते यांना दिले.