सावंतवाडी,दि.१२: येथील सुपुत्र प्रसाद अरविंदेकर यांची अमेचेर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया ( AKFI )या संस्थेवर व्हाईस प्रेसिडेंट पदी नियुक्ती करण्यात आली.
अमेचेर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया सन २०१३ ते २७ या कार्य करिनीची निवडणूक प्रक्रिया न्यू दिल्ली येथे कन्स्तिशन क्लब मध्ये पार पडली.यामध्ये २८ राज्य व आठ केंद्रशासित राज्याचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
निवडणूक प्रक्रिया तेलंगणा आंध्राचे रिटायर्ड जस्टीस डीएसआर वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यामध्ये महाराष्ट्रातून श्री प्रसाद अरविंदेकर यांची AKFI या संस्थेवर
व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली तशी घोषणा जस्टीस डी एस आर वर्मा यांनी जाहीर केली.
यावेळी AKFI चेअरमन आनंद चव्हाण,अध्यक्ष राजेंद्र ठाकूर, एक के एफ आय चे सेक्रेटरी उशी रेड्डी,दिल्ली चे राधेश्याम सैनी व वर्ल्डकबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष ढोरजी लांबा,नेपाळचे सेक्रेटरी भक्ता संजू यांनी श्री अरविंदेकर यांचे अभिनंदन केले.