सावंतवाडी, दि.११ : तालुक्यातील मुळगाव सातार्डा येथील निवृत्त पदवीधर केंद्रप्रमुख शंकर उर्फ नाना वासुदेव पवार वय ६१ यांचे अल्पशा आजाराने रविवारी सायंकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी श्री उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, काका, काकी, भाऊ, भावजई बहीण भावोजी, भाचे असा मोठा परिवार आहे. मळगाव सावळवाडी प्राथमिक शाळेच्या पदवीधर शिक्षिका पूजा पवार यांचे ते पती होत.