… तर सदस्य पदासाठी ९१० जणांनी केले उमेदवारी अर्ज दाखल
सावंतवाडी, दि.०२ : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून एकूण ५२ ग्रामपंचायत मधून आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी एकूण १९३ तर सदस्य पदासाठी ९१० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान गेळे, आजगाव, नेतर्डे, आणि तांबोळी येथून सरपंच पदासाठी केवळ एक अर्ज आल्याने सरपंच निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
या नामनिर्देशन पत्राची छाननी पाच डिसेंबरला होणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत सात डिसेंबर आहे.
येत्या १८ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत साठी मतदान होणार आहे.