संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. नागरिकांमधून होत आहे नाराजी व्यक्त..
सावंतवाडी, दि.०२: येथील तहसीलदार कार्यालयात दर्शनी हॉलमध्ये ठेवण्यात आलेल्या बैठक व्यवस्थेतील एक बाक तुटला आहे.मात्र याकडे संबंधित विभागाचा लक्ष नसल्याने येथील कार्यालयात प्रशासकीय कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन मोडकळीस आलेल्या आणि तुटून पडलेल्या बैठक व्यवस्थेची दुरुस्ती करावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.