उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक दुर्भाटकर सर आणि ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांची प्रमुख उपस्थिती
सावंतवाडी, दि.०३ : मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे तालुक्यातील पत्रकारांसाठी आज शनिवारी ०३ डिसेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक ज्ञानेश्वर दुर्भाटकर, मराठी पत्रकार संघ राज्याध्यक्ष गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, पत्रकार संघ जिल्हा सचिव संतोष सावंत, प्रसिद्धीप्रमुख हरिश्चंद्र पवार, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, तालुकाध्यक्ष प्रवीण मांजरेकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर,विजय देसाई राजेश मोंडकर,सचिन रेडकर, उमेश सावंत,मोहन जाधव, विनायक गावस,कोकणसाद पाटील,जतिन भिसे,शैलेश मयेकर, सिद्धेश सावंत,अनिल भिसे, आदी पत्रकार उपस्थित होते.
दरम्यान अस्थिरोग तज्ञ डॉ.पांडुरंग वजराटकर, डॉ.सागर जाधव डॉ.चौगुले,डॉ. संदीप सावंत, डॉ.निखिल अवधूत,डॉ.मनाली पतवारी, हॉस्पिटल इन्चार्ज उबाळे मॅडम, पी.पी राणे, विद्या येळेकर, कुशे, लॅब टेक्निशियन नितीन सौदागर,प्रशांत सातार्डेकर, अमित लिंगवत, लॅब असिस्टंट वैभवी बांदेकर, शलाका देसाई, अंकिता गवस, परिचर छाया राऊळ,अनिता अहिरे, आदी हॉस्पिटल स्टाफचे या शिबिराला सहकार्य लाभले.
यावेळी बोलताना डॉक्टर दुर्भाटकर यांनी मला जसे सहकार्य केले तसेच माझ्या स्टाफलाही सहकार्य करा माझ्या चांगल्या कामात नेहमीच पत्रकारांचा मोठा वाटा असतो असे कौतुक करत पत्रकारांचे आभार मानले.