युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला दोडामार्ग वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

0
75

न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाला उपस्थित सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर सोबत धमालदोडामार्ग,दि.१२: भाजपा युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी दोडामार्ग येथे युवा उद्योजक विशाल परब यांचे ढोल ताशांच्या गजरात दिमाखात स्वागत करण्यात आले.यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर यांचा न्यू होममिनस्टर कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला दोडामार्ग वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा उद्योजक विशाल परब व त्यांच्या सौ वेदिका परब व दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी युवा उद्योजक विशाल परब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात केली.
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देवीदास गवस, नगरसेवक नितीन मनेरकर, नगरसेवीका गौरी पार्सेकर, नगरसेवीका क्रांती जाधव, नगरसेवीका संजना म्हावळकर, नगरसेवक रामचंद्र मणेरीकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, सौ. वेदीका परब प्रभाकर परब, सौ. प्रमिला परब, विकास परब, माजी तालुकाध्यक्ष प्रविण गवस, सरपंच संघटना अध्यक्ष देवेंद्र शेटकर, माजी नगरसेवक समीर रेडकर, सामजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक, आदी उपस्थित होते.दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here