श्री रुजुल पाटणकर सरांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन..
सिंधुदुर्ग, दि.०१ : श्री संजु परब मित्र मंडळ सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्हा ज्युडो कराटे आकिदो असोसिएशन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरिय भव्य ज्युडो स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव च्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले.
दरम्यान कु.आराध्य नाटेकर सुवर्णपदक, कु.अस्मी तेंडोलकर व कु·मनवा साळगांवकर यांनी रौप्य पदक, तर कु. वैष्णव सावंत, देवांश यादव, व सोहम देशमुख यांनी कास्य पदक मिळवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
या स्पर्धेत विद्यार्थ्याना श्री. दिनेश जाधव सरांचे प्रशिक्षण लाभले तर श्री रुजुल पाटणकर सरांनी विद्यार्थ्यानाचे शाळेच्यावतीने अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.