या उपक्रमाच्या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा हा देण्यात आला संदेश…
सिंधुदुर्ग, दि.०१ : उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे नवीन प्रवेश घेतलेले प्रथम वर्षाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग तसेच वेताळ बांबर्डे येथील ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजी कोकण विजय बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश देण्यात आला.
उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रदीप हळदवणेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक डॉ. संदीप गुरव, डॉ. गिरीश उईके, प्रा. हर्षवर्धन वाघ, प्रा.महेश शेडगे, कर्मचारी वर्ग श्री. ज्ञानेश्वर सावंत,श्री.तुकाराम खरात,श्री.रवी फुके,श्री.राजू पावसकर, श्री. अविनाश नाईक, श्री.नदकिशोर पालव व सौ. माळकर या सर्वांनी बंधारा बांधण्याच्या कामात विद्यार्थ्यांसोबत सक्रिय सहभाग घेतला.या प्रसंगी बांबर्डे गावातील प्रगतशील शेतकरी श्री. श्रीकृष्ण नारायण भोसले व श्री. बापू सुर्वे यांची उपस्थिती व मोलाचे सहकार्य लाभले. या बंधाऱ्याच्या माध्यमातून अडवलेल्या पाण्याचा वापर वेताळ बांबर्डे व डिगस या परिसरातील रब्बी भाजीपाला घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भविष्यात नक्कीच होणार आहे.
सर्व उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी, अधिकारी,कर्मचारी व ग्रामस्थ यांनी मोठ्या उत्साहाने बंधारा बांधण्याच्या मोहिमेमध्ये सहभाग घेतला.उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे मार्फत राबविलेल्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाबद्दल वेताळ बांबर्डे गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व महाविद्यालयाला शुभेच्छा दिल्या.