सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे मुख्याधिकारी साळुंखे यांना पत्रकार कक्षा बाबत देण्यात आले लेखी निवेदन

0
86

सावंतवाडी,दि.२६ :सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेत तालुक्यातील आणि शहरातील पत्रकारांसाठी दिलेला व सद्यस्थितीत दुरावस्थेत असलेला पत्रकार कक्ष अद्ययावत करण्यात यावा अशी मागणी केली. येत्या ४ दिवसांत स्वतः या पत्रकार कक्षाची पहाणी करून पत्रकार कक्ष सुस्थितीत केला जाईल अस आश्वासन मुख्याधिकारी यांनी यावेळी दिल.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष अनंत जाधव सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सचिव मयुर चराठकर सहसचिव विनायक गांवस, उपाध्यक्ष दीपक गांवकर, प्रसन्न राणे, सदस्य नरेंद्र देशपांडे,प्रेस क्लबचे रूपेश हिराप आदी उपस्थित होते.
सावंतवाडी नगर परिषदेने सावंतवाडी तालुक्यातील आणि शहरातील पत्रकारांसाठी पत्रकार कक्ष दिलेला आहे. या पत्रकार कक्षाची दुरावस्था झाली असून याबाबतचे लेखी निवेदन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या हस्ते मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना देण्यात आले या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की या पत्रकार कक्षातील फर्निचर तसेच अन्य साहित्य नसल्यामुळे पत्रकार कक्षात बसता येत नाही. तरी पत्रकार कक्षाची दुरुस्ती रंगरंगोटी आणि फर्निचरसह वातानुकूलित पत्रकार कक्ष तयार करण्यात यावा
इंदिरा गांधी व्यापारी संकुलामध्ये पहिल्या मजल्यावर हा पत्रकार कक्ष आहे पत्रकार कक्षाच्या समोरच बॅरिस्टर नाथ पै सभागृह आहे यापूर्वी पत्रकार कक्षाच्या नूतनीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र काम सुरू झाले नव्हते. त्यामुळे मुख्याधिकारी साळुंखे यांनी स्वतः लक्ष घालून पत्रकार कक्ष अद्यावत करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी येत्या ४ दिवसांत स्वतः या पत्रकार कक्षाची पहाणी करून पत्रकार कक्ष सुस्थितीत केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here