सिंधुदुर्ग,दि.२७ : दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या कोकण विभागातर्फे निवती किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेचा दुसरा टप्पा रविवार २८ मे रोजी राबविण्यात येणारे आहे. सात महिन्यांपूर्वी २४ ऑक्टोबरला या किल्ल्यावर दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्यावतीने मराठा आरमार दिन साजरा करत छत्रपती शिवरायांच्या या आरमारी दुर्गास मानवंदना देण्यात आली होती. तसेच या किल्ल्याची स्वच्छता व सजावट करण्यात आली होती. त्याचवेळी टप्याटप्याने सर्वांच्या सहकार्याने निवती किल्ला स्वच्छता करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार या किल्ल्यावर दुसऱ्या टप्प्यातील ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शिवप्रेमींनी निवती किल्ल्यावरील या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक (९८६०२५२८२५) आणि प्रसाद सुतार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे समीर नाईक आणि पंकज गावडे यांनी केले आहे.