सावंतवाडी,दि.२५: तालुक्यातील सांगेली येथील माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेली विद्यालयाचा बारावीचा निकाल १००% लागला आहे.
यामध्ये कला शाखेकडून सचिन सुनील खोत हा ८१% टक्के गुण मिळवत प्रथम आला कु. संकेत संतोष सांगेलकर याने ६७.६७% गुण मिळत द्वितीय तर कुमार अर्जुन गणपत पारधी ५८.५० टक्के गुण मिळवत तिसरा आला.
वाणिज्य शाखेकडून कुमारी सानिया बापू पवार ७१.१७% टक्के गुण मिळवत प्रथम आली तर विष्णू गुणाजी परब ६८.३३% गुण मिळवत द्वितीय, कुमारी गौरी विजय राणे हिने ६७.५०% गुण मिळवत तिसरा क्रमांक प्राप्त केला.
तर विज्ञान शाखेकडून कुमारी सानिया शामराव जाधव ७४% टक्के गुण मिळवत प्रथम, कुमार भूषण सोमा सावंत ७०% टक्के गुण मिळवत द्वितीय तर कुमारी साक्षी सुनील पवार ६८% टक्के गुण मिळवत तिसरी आली.
दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२३ या शैक्षणिक वर्षात विद्यालयातून एकूण ९४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला त्यापैकी एका विद्यार्थ्याने विशेष प्राविण्य मिळवले तर ४४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी ४७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर उर्वरित दोन विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी प्राप्त केली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री पंढरी पुनाजी राऊळ, सचिव श्री विश्वनाथ रामचंद्र राऊळ, प्राचार्य श्री रामचंद्र दशरथ घावरे आणि सर्व संस्था पदाधिकारी शाळा समिती सदस्य सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.