वेंगुर्ले,दि.१७: तालुक्यातील रेडी नागोळेवाडी येथील द्विभुज,नवसाला पावणारा तसेच जगप्रसिद्ध ख्याती असलेल्या गणपतीचा ४९ वा वाढदिवस समारंभ शुक्रवार दिनांक १८ एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी ६ वाजता अभिषेक, सकाळी ८ वाजता सत्यविनायक महापूजा, दुपारी १२.३० वाजता आरती, दुपारी १ ते ४ पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ८ वाजता स्थानिकांची भजने, रात्री ८ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्व गणेश भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव गजानन देवस्थान, रेडी नागोळेवाडी यांनी केले आहे.