सावंतवाडीत आयोजित परिवर्तन रॅलीला उपस्थिती…
सावंतवाडी,दि.१४: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी समाज मंदिर येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी श्री. परब यांनी आंबेडकरप्रेमी बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच आयोजित परिवर्तन रॅलीला उपस्थिती लावली.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे,शिवसेना शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, सुरज परब, परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत, नंदू शिरोडकर, गोविंद बाळा वाडकर, शैलेश मेस्त्री, लारा, भिमगर्जना बौध्द मंडळ व समाज मंदिर मित्र मंडळाचे अध्यक्ष मंगेश कदम, उपाध्यक्षा सौ. वर्षा कदम, सचिव रुपेश जाधव आदी उपस्थितीत होते.