ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर !

0
6

कोकणच्या पत्रकारितेतील ‘कोकणरत्नां’चा रविवारी विविध पुरस्कारांनी गुणगौरव!

सावंतवाडी,दि.११: कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा ‘पत्रकार भूषण पुरस्कार २०२५’ दै. लोकसत्ता, दै. रत्नागिरी टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रतिवर्षी समाजाच्या विविध क्षेत्रातील आपल्या योगदानातून समाजजीवन संपन्न करणाऱ्या मानवंतांना विविध पुरस्कार दिले जातात. रत्नागिरी येथे मान्यवारांच्या उपस्थितीत हा पुरस्कार श्री. लोंढे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे गेली अनेक वर्ष पत्रकारिता क्षेत्रात भरीव असं कार्य करत आहे.‌ समाजातील सोशीत, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा पुढाकार असतो. आदर्श, निर्भिड पत्रकार अशी त्यांची ओळख असून आजवर अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. सामाजिक, साहित्यिक व सहकार क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कोकण मराठी पत्रकार संस्थेचा ‘पत्रकार भूषण पुरस्कार २०२५’ जाहीर करण्यात आला आहे.

‘कोकण मराठी पत्रकार संस्थे’चा प्रथम वर्धापन दिन सोहळा व त्यानिमित्ताने कोकणवासिय पत्रकारांचा ‘स्नेहमेळावा’ येत्या रविवारी दि. १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक ११.३० वाजता गणेश मंगल कार्यालय, काळकाई मंदिराच्या शेजारी, मु. पो.भरणे, ता. खेड, जि. रत्नागिरी येथे मान्यवारांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने कोकणच्या पत्रकारितेतील अनेक ‘कोकणरत्नां’चा विविध पुरस्कारांनी गुणगौरव दिग्गज्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या मेळाव्यात कोकणातील नामवंत पत्रकारांना ‘पत्रकार भूषण’ आणि समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावणार्‍या कोकणवासियांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार, तथा दैनिक ‘प्रहार’चे संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख अतिथि म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री गृह (शहरे) महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन विभाग योगेश कदम, दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरु संजय भावे, दै. ‘पुढारी’चे निवासी संपादक शशिकांत सावंत, वसई-विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे व महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी कोकणातील वृत्तपत्रप्रेमी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन ‘कोकण मराठी पत्रकार संस्थे’चे संस्थापक, अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, कोषाध्यक्ष संतोष धोत्रे, प्रमुख कार्यवाह दिलीप देवळेकर, संयुक्त कार्यवाह दिलीप शेडगे व उपाध्यक्ष श्रीकांत चाळके यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here