राज्य समन्वयक श्रीपाद अभ्यंकर यांनी केली निवड जाहीर
सावंतवाडी,दि.०५: सिंधुदुर्ग जिल्हा सकल हिंदू समाजाच्या जिल्हा अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांची नेमणूक सकल हिंदू सामाजाचे राज्य समन्वयक श्रीपाद अभ्यंकर यांनी केली आहे,त्यांनी याबाबतचे पत्र सीताराम गावडे यांना पाठविले आहे.
सीताराम गावडे हे गेली पस्तीस वर्षे विविध सामाजिक क्षेत्रातील संघटनांवर कार्यरत असून, हिंदू समाजासाठी देत असलेल्या योगदानाची दखल घेऊन ही निवड केल्याचे राज्य समन्वयक श्रीपाद अभ्यंकर यांनी म्हटले आहे,
सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चे संस्थापक अध्यक्ष, विशेष कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग, भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य,सकल मराठा समाज सावंतवाडी तालुका अध्यक्ष, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडियाचे सिंधुदुर्ग ज्येष्ठ सल्लागार ,बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळ संस्थापक अध्यक्ष अशी विविध पदे सीताराम गावडे यांनी भूषवून त्या पदांना न्याय देण्याचे काम केले आहे,त्यांच्या या निवडीचे सकल हिंदू समाजाने अभिनंदन केले आहे.