भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन.
सावंतवाडी,दि.०३: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे बारावीच्या पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) शाखेतील विद्यार्थ्यांसाठी MHT-CET 2025 मोफत सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा रविवार, १३ एप्रिल २०२५ रोजी होणार असून, विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. मुख्य परीक्षेप्रमाणेच ही परीक्षासुद्धा डिजिटल इंटरफेसवर आधारित असेल. यामुळे विद्यार्थ्यांना वेळेचे व्यवस्थापन आणि प्रश्नांच्या स्वरूपांची माहिती मिळेल.
परीक्षा पूर्णपणे मोफत असून ज्या विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे, असे सर्व अभियांत्रिकी इच्छुक विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. कॉलेजच्या अद्ययावत डिजिटल लॅबमध्ये ही परीक्षा घेण्यात येईल. नावनोंदणीसाठी अंतिम तारीख १० एप्रिल आहे. अधिक माहितीसाठी 9604272566 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा खाली दिलेल्या गुगल फॉर्मवर नावनोंदणी करावी असे आवाहन कॉलेजतर्फे करण्यात आले आहे. https://forms.gle/fvfHS83u17LKK7H1