सावंतवाडी,दि.०२: येथील नेमळे कौल कारखाना ते नेमळे तिटा दरम्यान ६०० मी. चा रस्ता पूर्णपणे डांबरीकरणाचा होता मात्र ठेकेदाराने फक्त खडीकरण केल्याने वर्षभरात खडी उकरल्याने रस्त्याची अक्षरशः चाळणं झाली आहे.
यामुळे शाळकरी मुले तसेच वाहन चालकांचे वारंवार अपघात होत असल्यामुळे नेमळे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कडे वारंवार रस्ता दुरुस्ती संदर्भात पत्र व्यवहार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आला. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्ती संदर्भात नेमळे ग्रामस्थांनी २६ जानेवारी दिवशी लेखी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांनी २५ जानेवारी दिवशी संध्याकाळी आंदोलन कर्त्या नेमळे ग्रामस्थांची भेट घेऊन येत्या २६ जानेवारीला तुम्ही आंदोलन करू नका उद्या पासून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम आम्ही सुरु करणार तसेच २५ फेब्रुवारी च्या आत आम्ही या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करणार असल्याचे लेखी पत्र नेमळे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना दिले यामुळे नेमळे ग्रामस्थांनी २६ जानेवारी दिवशी करण्यात येणारे आंदोलन थांबविण्यात आले मात्र दोन महिन्याचा कालावधी संपत आला तऱी डांबरीकरणाचा पत्ताच नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार एक मेकांकडे बोटे दाखवून मूग गिळून गप्प बसण्याचे काम करत आहेत
बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी नेमळे ग्रामस्थांच्या डोळ्यात धूळ फेक करून केलेली ही निव्वळ फसवणूक आहे ६०० मीटर डांबरीकरणासाठी शासनाकडून मंजूर झालेला निधी दोन वर्षे होऊन गेली तरी रस्त्याचे काम अपूर्णच मग निधी खड्ड्यात गेला की खिशात गेला अशी उलट सुलट चर्चा सुरु आहें.
याची वरिष्ठ पातळीवर तक्रार करून चौकशी लावणार असल्याचे यावेळी नेमळे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे.