सावंतवाडी,दि.०२: भारतरत्न डॉ (APJ) ए पी जे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता ७ वी मध्ये सावंतवाडी तालुक्यातून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं.४ शाळेचा विद्यार्थी कु. हर्ष रवींद्रनाथ गोसावी हा गुणवत्ता यादीत तालुक्यात प्रथम आलेला आहे. तसेच कु.
सुरभी महेश सावंत ही तालुक्यात पहिल्या ५ मध्ये चमकली आहे. ५ मुलांनी २०० पेक्षा जास्त गुण मिळवून शाळेचा शैक्षणिक दर्जा सिद्ध केला आहे.
जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण देणारी ही जिल्हा परिषदेची शाळा विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांत नेहमीच अग्रेसर असते. उच्चशिक्षित, प्रशिक्षित दर्जेदार शिक्षक, सुसज्ज आकर्षक इमारत हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात झालेल्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
कला,क्रीडा, ज्ञानी मी होणार या उपक्रमात जिल्हा स्तरावर कु. हर्ष रवींद्रनाथ गोसावी हा २०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम आला आहे. त्याला क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. ४ x १०० रिले प्रकारात मुलांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. समूह गायन तालुक्यात प्रथम क्रमांक, कबड्डी द्वितीय क्रमांक अशा अनेक क्रीडा प्रकारात शाळेने उल्लेखनीय यश मिळवले आहे.
शाळेच्या या गुणवत्तापूर्ण कामगिरीचे व मुलांच्या या यशाबद्दल आणि अभिमानास्पद कामगिरीबद्दल शालेय व्यवस्थापन समिती, सर्व पालक,शिक्षक मार्गदर्शक शिक्षक यांच्याकडून कौतुक होत आहे.