भोसले नॉलेज सिटी येथे ‘जागतिक महिला दिन ‘ उत्साहात साजरा..

0
6

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम..

सावंतवाडी,दि.०९: भोसले नॉलेज सिटी येथे जागतिक महिला दिन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेच्या अध्यक्षा ॲड.अस्मिता सावंत भोसले, उपाध्यक्षा सरोज देसाई, सचिव संजीव देसाई आणि प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी वायबीआयटी प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे तसेच संस्थेतील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

२०२५ हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीचे वर्ष आहे. यानिमित्त त्यांचे जीवनकार्य नाटक स्वरूपात सादर करण्यात आले. संस्थेतील पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस विद्यार्थिनी आणि कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये मेहंदी स्पर्धा, खडे मसाल्यांपासून दागिने बनविणे आणि पाककला स्पर्धा यांचा समावेश होता. विजेत्या स्पर्धकांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.

_उपस्थितांना मार्गदर्शन करताना ऍड.अस्मिता सावंतभोसले यांनी स्त्री एक मार्गदर्शक व प्रेरणादायी व्यक्ती आहे. ती आपल्या आयुष्यात विविध भूमिका पार पाडते. या प्रत्येक भूमिकेचा आपण आदर करायला हवा असे म्हटले. महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा उल्लेख करत भोसले नॉलेज सिटी महिलांच्या प्रगतीसाठी नेहमीच कटीबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी संजीव देसाई आणि सुनेत्रा फाटक यांनी देखील मनोगत व्यक्त केले. दुपारच्या सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यत आले._

_सूत्रसंचालन नमिता भोसले तर आभार प्रदर्शन मानसी कुडतरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हवाबी शेख, मानसी कुडतरकर, प्रणाली जोशी, श्रद्धा परब, अद्विका आरोलकर, स्नेहा सावंत, प्राची कुडतरकर, महादेवी मलगर, मंजुषा जामसंडेकर, प्रणाली धामणे यांनी मेहनत घेतली._

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here