सावंतवाडी,दि.०९ : येथील राजे प्रतिष्ठान तर्फे महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला भगिनींचा राजे प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या वतीने सन्मान करण्यात आला.
महिला सक्षम असतात ते राज्य सक्षम असतं. आरक्षणाच्याद्वारे महिलांना राज्य कारभार करण्याची संधी दिली आहे. महाराष्ट्रात वडीलांप्रमाणे आईचं नाव देखील लावलं जातं आहे अस मत व्यक्त करत माजी मंत्री आ. दीपक केसरकर यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राजे प्रतिष्ठानतर्फे आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री. केसरकर पुढे म्हणाले, जे पुरुष करू शकतात ते आज महिला देखील करू शकतात. सिंधुरत्न योजनेतून मोठा लाभ महिलांना दिला जात आहे. समाजात बदल घडवून आणण्याची ताकद महिलांमध्ये आहे. लाडकी बहीण सारखी योजना महिलांसाठी कार्यान्वित आहे.यापुढेही जाऊन राज्यात महिलांसाठी उपक्रम राबविले जाणार आहेत असं सांगत उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमदार दीपक केसरकर, माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, ज्ञानेश्वर पारधी, कल्याण कदम, साक्षी गवस, पुजा गावडे, सेजल पेडणेकर, संचिता गावडे, अनघा रांगणेकर, सेजल पेडणेकर, अंकिता सावंत, सुभाष गावडे, सगिता पारधी, साक्षी तळवणेकर, अंकिता माळकर, सुहासिनी शेट्ये, आरोही गवस आदींसह राजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.