न्यू इंग्लिश स्कुल हळदीचे नेरूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ऍडव्हेंचर शिबिरातून अनुभवले रॅपलिंग व क्लाइम्बिंग..

0
169

महादेवाचे केरवडे येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाचे आयोजन

सिंधुदुर्ग, दि.३०: रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मार्फत महादेवाचे केरवडे म्हाडगुत वाडी येथील डोंगरावर न्यू इंग्लिश स्कुल हळदीचे नेरूर येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय ऍडव्हेंचर शिबिराचे आयोजन करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना साहसी खेळांबाबत माहिती व्हावी त्यांना आवड निर्माण व्हावी या उद्देश डोळ्यासमोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर यांच्या हस्ते करण्यात आले.
या उदघाटन कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष अमित वळंजू, असिस्टंट गव्हर्नर श्रीमती नीता गोवेकर, माजी अध्यक्ष सचिन मदने, केरवडे ग्रामपंचायत सरपंच सौ. प्राची परब, लयभारी केरवडेकारी मित्रमंडळ चे अध्यक्ष कॅप्टन कृष्णा परब, उपाध्यक्ष दिनेश कुंभार, ऍड किशोर शिरोडकर, मंगेश परब, पंढरीनाथ परब, विजय म्हाडगुत, अरुण म्हाडगुत, न्यू इंग्लिश स्कुल हळदीचे नेरूर चे मुख्याध्यापक श्री शंकर कोरणे, श्रीकांत परब, मिनल गुंजाळ, श्याम निकम, हर्षा आळवे उपस्थित होते.
या शिबाराचे मार्गदर्शक म्हणून संदेश गोसावी व सहदेव सनाम यांनी काम पाहिले तसेच कृष्णा लिंगायत व सर्वेश नाईक यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले.
या शिबिराच्या आयोजनामध्ये दुर्ग मावळा प्रतिष्ठान चे कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष प्रसाद सुतार, कुडाळ तालुकाध्यक्ष,शिवाजी परब, रोहन राऊळ, प्रणय राऊळ, संकेत सावंत, सुहास सावंत, सचिन मेस्त्री, सौ गार्गी नाईक यांनी मेहनत घेतली.
या उपक्रमासाठी दिनेश कुंभार यांनी सर्वांना अल्पोपाहराची सोय केली, तर शिबिरातील स्वयंसेवकांना प्रसाद सुतार, तुषार परब व प्रथमेश पालकर यांनी जेवणाची सोय केली.निलेश सावंत यांनी गोणपाटांची सोय केली. सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या उपक्रमास मदत करणाऱ्यांचे दुर्गा मावळा प्रतिष्ठान तर्फे आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here