दोडामार्ग,दि.०७: तालुक्यातील तळकटकट्टा येथील विठ्ठल रखुमाई हरिनाम सप्ताहाला शनिवार ८ फेब्रुवारीला प्रारंभ होणार आहे.
यानिमित्त मंदिरात भजन, ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे, असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. शनिवारी दुपारी महाप्रसाद तर ९ फेब्रुवारीला सांगता होणार आहे. यानिमित्ताने दोन दिवस धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी रात्री भजनाचा कार्यक्रम तर दुसऱ्या दिवशी दुपारी महाप्रसाद आणि तीर्थप्रसादाचे वाटप होणार आहे.
येथील मंदिरात १९३२ पासून हरिनाम सप्ताहची सुरुवात झाली. पूर्वांपार पासून चालत आलेल्या या सप्ताहाला येथील ग्रामस्थ, चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंदाने एकत्रितपणे हा कार्यक्रम साजरा करतात. यावर्षीही भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल रखुमाई सप्ताह मंडळाचे सदस्य सर्वेश साळगावकर यांनी केले आहे.