राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नवोपक्रमांची निवड

0
44

सिंधुदुर्ग,दि.०३: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे अंतर्गत संशोधन विभागामार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ मध्ये प्राथमिक गटातून कै. रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ चे पदवीधर शिक्षक गणेश भिकाजी नाईक व जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सांगेली सावरवाड चे पदवीधर शिक्षक सुनिल परशुराम करडे यांची तसेच पूर्व प्राथमिक गटातून विद्या संतोष गुराखे आणि शैलजा सगुण मातोंडकर यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे अंतर्गत संशोधन विभागामार्फत दरवर्षी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा पूर्व प्राथमिक गट, प्राथमिक गट, माध्यमिक गट, विषयसहाय्यक व विषय साधनव्यक्ती गट, पर्यवेक्षित अधिकारी गट अशा एकूण पाच गटामध्ये ही स्पर्धा घेतली जाते.
प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक गटातून पाच असे एकूण राज्याला प्रत्येक गटातील १८५ नवोपक्रम सादर होतात. यातून राज्यस्तरीय तज्ज्ञ परीक्षकांकडून प्रत्येक गटासाठी पहिले १० नवोपक्रम निवडले जातात.
या मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्राथमिक गटातून गणेश नाईक व सुनिल करडे आणि पूर्व प्राथमिक गटात विद्या संतोष गुराखे आणि शैलजा सगुण मातोंडकर यांची निवड झाली असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे ६ फेब्रुवारी २०२५ रोजी नवोपक्रम सादरीकरण व ७ फेब्रुवारी २०२५ रोजी पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून यशस्वी स्पर्धेकांचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग चे प्राचार्य राजेंद्र कांबळे, संशोधन विभाग प्रमुख डॉ लवू आचरेकर, जेष्ठ अधिव्याख्याता यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here