माघी गणेश जयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार..
सावंतवाडी,दि.२९: शहरातील श्री देव दैवज्ञ गणपती मंदिराच्या ३५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दैवज्ञ समाजाचे गुरु श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महास्वामीजी यांच्या शुभहस्ते कलशारोहण सोहळा आयोजित केला आहे.
तसेच प्रतिवर्षाप्रमाणे माघी गणेश जयंती,नारायण स्वामी पुण्यतिथी व बालाजी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त खालील कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
गुरुवारी दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी
सकाळी ८ ते दु.१ दरम्यान मंगलाचरण, प्रायश्चित्तविधी, गणपतीपुजन , स्वस्ति पुण्याहवाचन, मातृकापुजन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण , प्राकारशुद्धी, स्नानविधी, प्रधानदेवता स्थापना, वास्तूस्थापन, अग्नीस्थापन, ग्रहमंडलदेवता स्थापन, वास्तूयाग, ग्रहयोग लघुपूर्णाहुती, तर सायंकाळी सहा वाजता सावंतवाडी नगरपालिकाकडुन विठ्ठल मंदिररोड ते गणपती मंदिर अशी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तर दुसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक ३१ जाने. रोजी
स.८ ते १० दरम्यान प्राकारशुद्धी आवाहितदेवता पूजन, प्रधानहोम, स.१० वाजून २० मि. कलशप्रतिष्ठा श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महास्वामीजी यांच्या शुभहस्ते पंचांगहोम, बलिदान, पूर्णाहुती,आरती व दुसऱ्या दिवशी शनिवारी दि.१ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती निमित्त स. ८ वा. श्रींची पूजाअर्चा, अभिषेक वगैरे स. १०.३० वा. श्री गणेश जन्मावर किर्तन, दु. १२वा. श्री गणेश जन्म, दु. १२:३० पासून श्री गणेश नामजप, रात्रौ ८ वा. सुश्राव्य भजन
तर रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी स. ८ वा. नारायण स्वामींच्या पुण्यतिथी श्रींची पूजाअर्चा व तदनंतर स्वामींच्या समाधी व पादुकांचे पूजन, स. ११ वा. पावणी, दु.१ वा. महाप्रसाद रात्रौ ८ वा. सुश्राव्य भजन तर
सोमवार दि. 3 फेब्रुवारी रोजी
स.८ वा. श्री बालाजी मठात श्रींची पूजाअर्चा तदनंतर स्वामींच्या समाधी व पादुकांचे पूजन व अभिषेक रात्रौ ८ वा. सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
तरी या सर्व कार्यक्रमास बेळगाव, गोवा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविक भक्त व सर्व दैवज्ञ बांधवांनी उपस्थित राहून माघी गणेश जयंती उत्सवाचा आणि श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महास्वामीजीचा आशीर्वादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त दैवज्ञ ब्राह्मण समाज सावंतवाडी,दैवज्ञ गणपती मंदिर अध्यक्ष शिवशंकर नेरूरकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश पनवेलकर यांनी केले आहे.