स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कट्टर शिवसैनिक बबन सागावकर यांच्याकडून कल्पवृक्ष रुपी स्मारकाची पुनर्बांधणी..

0
102

सावंतवाडी,दि.२३: हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज पाळणेकोंड धरण येथे बाळासाहेब ठाकरे स्मृती कल्पवृक्ष स्मारकाची पुनर्बांधणी करण्यात आली.
दरवर्षी जयंती उत्सवानिमित्त सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व नगरसेवक यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन केले जाते.

नऊ वर्षांपूर्वी बाळासाहेब यांचे जिवंत कल्पवृक्ष रुपी स्मारक कट्टर शिवसैनिक व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि त्या वेळचे नगरसेवक यांनी एकत्रित येऊन स्मारक उभारले होते.
मात्र या ठिकाणी सावंतवाडी नगर परिषदेचा नवीन पाणी पुरवठा फिल्टरेशन प्लांट होत आहे.त्यामुळे सदर जागा बाधित होत असल्याने पर्यायी दुसऱ्या ठिकाणी आज बाळासाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवीन पाच कल्पवृक्षांचे रोपण करून नवीन स्मारक उभारण्यात आले आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक उमाकांत वारंग,उमेश कोरगावकर, विलास जाधव, सुरेश भोगटे, गणपत बांदेकर, दीपक सावंत, रत्नाकर माळी, बंड्या तोरसेकर, प्रसाद कुडतरकर, महेश नार्वेकर, संदीप नाईक तसेच पाणीपुरवठा अधिकारी भाऊ भिसे,पर्यवेक्षक गजानन परब आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here