२६ जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर ग्रामस्थांसह उपोषणाला बसणार
सावंतवाडी,दि.२३: तालुक्यातील सावरवाड ते कलंबिस्त दरम्यान असलेल्या मुख्य रस्त्याला खडीकरण करून बराच कालावधी उलटून गेला आहे. त्या रस्त्याला वेळेत डांबरीकरण न झाल्याने पुन्हा त्या रस्त्यात खड्ड्याचे साम्राज्य तयार झाले आहे. रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्याने येथून चालताना व वाहतूक करताना नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आणि रस्त्याचे काम परिपूर्ण न करता ठेकेदाराला कामाची बिले दिल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तावडे यांनी केला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी निवेदनही दिले होते मात्र अद्यापही संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याने येत्या २६ जानेवारी रोजी कलंबिस्त ग्रामस्थांसह सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी कार्यालया समोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती श्री तावडे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.