माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दिपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती
सावंतवाडी,दि.३०: आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी काढलेल्या श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॅलेंडर चा प्रकाशन सोहळा आज माजी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पार पडले.
आमदार दिपक केसरकर मित्रमंडळ व लायन्स क्लब रोटरी क्लब, रोट्रक्ट क्लब च्या वतीने मिनी महोत्सवाचे आयोजन २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनला आमदार निलेश राणे आले होते यावेळी आमदार दिपक केसरकर यांच्या कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी सालाबादप्रमाणे काढलेल्या श्रीमंत योगी या नववर्ष कॅलेंडर चे प्रकाशन कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,तालुका प्रमुख नारायण राणे,चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे,संजू गावडे, पांडुरंग गावडे,सुभाष गावडे,सुरेश गावडे,सोनू गावडे,बबन शेळके,संजय गावडे,आदि उपस्थित होते.