सोनुर्ली येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी..

0
132

आरोस येथील मतिमंद निवासी विद्यालयाला दैनंदिन
केले साहीत्यचे वितरण..

सावंतवाडी,दि.२७ : सोनुर्ली येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाने सामाजिक भान ठेवून यावर्षी पार पडलेल्या एस पी एल २०२३ क्रिकेट स्पर्धेच्या शिल्लक रकमेतून काही वाटा बाजूला काढत आरोस दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयाला अन्नधान्यासह दैनंदिन वापराचे साहीत्य वितरण केले.
नवयुवक कला क्रीडा मंडळ गेली पाच वर्षे एस पी एल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत,यापूर्वी शैक्षणिक तसेच आर्थिक स्वरूपात मंडळाने सडल हस्ते सहकार्य केलेले आहे यावर्षीही दोन गरजू व्यक्तींना मंडळाने आर्थिक मदत करण्याबरोबरच आरोस कोंडुरे येथे मतिमंद निवासी विद्यालयाला मंडळाने सहकार्य केले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष ओटवणेकर, सदस्य संदीप जाधव सत्यवान हिराप, सचिन साळगावकर, सत्यवान नाईक, सागर तेंडुलकर,सदू मसुरकर,राजाराम मटकर,आनंद देऊलकर, रुपेश हिराप आदी उपस्थित होते.
या ठिकाणी विद्यालयामार्फत विद्यार्थ्यांची घेण्यात येणारी काळजी तसेच त्यांचे दैनंदिनी व्यवस्था लक्षात घेता तेथील कर्मचाऱ्यांचे कार्य शब्दात न व्यक्त करण्या एवढे आहे असे उद्गार मंडळाचे अध्यक्ष श्री ओटवणेकर यांनी बोलतांना काढले. तर विद्यालयाचे मुख्याध्यापक रुपेश सावंत यांनी विद्यालयाची गरज ओळखून तसेच कार्य लक्षात घेता नवयुवक कला क्रीडा मंडळाने केलेल्या मदती बाबत आभार व्यक्त केले व भविष्यातही मंडळाने विद्यालयाला मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी विद्यालयाचे शिक्षक प्राणेश नाईक, सौ नंदिनी आचरेकर, सौ सरोज चव्हाण, श्री नंदा सावंत, सुलक्षणा कोकरे, श्री रामचंद्र गोडकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here