विद्यालयातील मुख्याध्यापक शंकर राऊळ यांनी मानले श्री जाधव यांचे आभार
सावंतवाडी,दि .०९: तालुक्यातील श्रीदेवी पावणाई रवळनाथ विद्यामंदिर शिरशिंगे या माध्यमिक विद्यालयाला शिरशिंगे गावातील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते गणपत आप्पा जाधव यांनी सीसीटीव्ही सेट भेट दिला. यावेळी प्रशालेतील मुख्याध्यापक शंकर राऊळ यांनी संपूर्ण विद्यालयाच्या वतीने गणपत जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
यावेळी श्री जाधव यांनी बोलताना आपण या समाजाचे काही देणे लागतो आणि या उदात्त हेतूने आपण या विद्यालयाला सीसीटीव्ही सेट भेट दिला असे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर राऊळ, शिरशिंगे गावचे सुपुत्र तसेच शिक्षक तुळशीदास राऊळ, शिक्षिका संध्या घोगळे,लता घावरे परब, श्री समुद्रे, सुमन राऊळ, विठ्ठल धोंड, संतोष राणे, संदीप जाधव आदी विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.